शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षांमध्ये १८ हजार जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:13 IST

राजस्थानी विकास मंडळाचा उपक्रम; दर स्वातंत्र्यदिनी होतेय शिबीर

ठळक मुद्देराजस्थानी विकास मंडळातर्फे धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यात आलेयंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्ष होतेसोलापुरात राजस्थानी विकास मंडळाची स्थापना ७० वर्षांपूर्वी करण्यात आली

सोलापूर : रक्तदानाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र रक्तदानातून सलग २३ वर्षे समाजाची सेवा करणे ही अवघड बाब आहे. राजस्थानी विकास मंडळाने रक्तदानाचा उपक्रम घेत २३ वर्षांत १८ हजार ६७० रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करत एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. 

यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्ष होते. या शिबिरात ५५१ जणांनी रक्तदान केले. सोलापुरात राजस्थानी विकास मंडळाची स्थापना ७० वर्षांपूर्वी करण्यात आली. राजस्थान येथून सोलापुरात आलेल्या कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकास राजस्थानी विकास मंडळात सहभागी करुन घेण्यात आले आहे. एकत्र राहून समाजोपयोगी काम करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. एखादा उपक्रम हाती घेतल्यास तो सतत पुढे चालू ठेवण्यासाठी मंडळाचा प्रयत्न असतो. 

असाच रक्तदान शिबीर घेण्याचा हा उपक्रम आहे. दरवर्षी घेण्यात येणाºया या शिबिरात ७० टक्के रक्तदाते हे नेहमीचे आहेत. जे दरवर्षी रक्तदान करतात तर ३० टक्के नव्याने जुळले जातात. रक्तदान करणाºयांमध्ये ४० ते ५० वेळा रक्तदान करणारे अनेक रक्तदाते आहेत. अशा रक्तदात्यांमुळे राजस्थानी विकास मंडळाकडून रक्तदानाची चळवळ सुरु आहे.

गरजू रुग्णांना मदतराजस्थानी विकास मंडळातर्फे धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना याचा वापर होतो. तसेच काही रुग्णांना रक्ताची पिशवी घेण्याची ऐपत नसते, त्यांनादेखील राजस्थानी विकास मंडळाकडून रक्त घेण्यास सहकार्य केले जाते. एखाद्या गरजूचा जीव वाचला तर यापेक्षा चांगले कार्य असू शकत नाही. यंदा रक्तदान शिबिरास २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यातही हा उपक्रम सुरुच राहील, असा विश्वास विजयकुमार जाजू यांनी बोलून दाखविला.

टॅग्स :SolapurसोलापूरBlood Bankरक्तपेढी