सोलापुरात चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची घोषणाबाजी

By Appasaheb.patil | Updated: October 15, 2023 20:47 IST2023-10-15T20:47:29+5:302023-10-15T20:47:57+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.

Black Flags Showed to Chandrakant Patil in Solapur, Bhim Army Raises Slogans Against Privatization | सोलापुरात चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची घोषणाबाजी

सोलापुरात चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची घोषणाबाजी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी आठ वाजता त्यांचे सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. याचवेळी भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रात्री आठ वाजता ते शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता, मात्र भीम आर्मीचे एका कार्यकर्त्याने अचानक येत पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. या गोंधळानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Black Flags Showed to Chandrakant Patil in Solapur, Bhim Army Raises Slogans Against Privatization