अकलूज/माळशिरस (जि.सोलापूर) - काँग्रेस पक्षाचा गावागावातला प्रत्येक कार्यकर्ता ताकदीचा असला पाहिजे़ कार्यकर्त्यांवर पक्ष उभा आहे. सध्या सत्ताधाऱ्यांची बेजबाबदार वक्तव्ये, देशाची न्यायव्यवस्था, मतदान प्रक्रिया याबाबत सर्वसामान्य माणूस विचलित झाला आहे. यासाठी आता ठोस उत्तर देण्याची गरज असून, येत्या निवडणुकांत महाराष्ट्राला भाजपा- सेनेपासून मुक्त केले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.अकलूज (ता. माळशिरस) येथे काँग्रेस कार्यकर्ता शिबिर झाले. चव्हाण म्हणाले, सरकारच्या थापेबाजीला लोक कंटाळले आहेत़ ‘आपलं सरकार, घोषणा दमदार’ असा त्यांचा नारा आहे.सरकारचा कर्जमाफीचा पैसा निवडणुकीच्या तोंडावर वाटून मते मिळवण्याचा डाव असावा, मात्र आता त्यांना जनता माफ करणार नाही, असे त्यांनी सांगितले़माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पक्षात संघटनेचा आदेश पाळणे महत्त्वाचे आहे़ खेड्यात वीज नाही, सीमेवर सैनिक शहीद होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास माढा मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क असेल, असेमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले़
महाराष्ट्र भाजपा-सेना मुक्त करा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:04 IST