शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 10:09 IST

Ram Satpue : लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पराभव केला.

Ram Satpute ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याराम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला.  आमदार सातपुते यांच्याविरोधात माळशिरसमध्ये मोहित पाटील यांनी जोरदार वातावरण केले आहे. राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काल एका सभेत बोलताना  भाजपाचे आमदार राम सातपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. तर कार्यकर्त्यांना भावनिक सादही घातली आहे. 

अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?

"येणाऱ्या काळात भाजपा निवडणूक हरणार असा प्रचार सुरू केला आहे. पण, एक सांगतो भाजपा कधी निवडणुका हरत नाही. विरोधकांनी लोकसभेत माळशिरस तालुक्यात १ लाख ८० हजारांचं लीड घेणार असं सांगितलं होतं. पण, त्यांना ८० हजारांचा लीडही घेता आलेलं नाही, असा टोलाही मोहिते पाटील यांना आमदार राम सातपुते यांनी लगावला. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला. वेगवेगळ्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आहे, आम्ही आमचा पराभव स्विकारत आहे, असंही राम सातपुते म्हणाले. 

"मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे. मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो. पण मी इकडेच राहिलो. आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो, मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभे रहा, येणाऱ्या काळात १०० टक्के महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे, आता नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. आपण माळशिरस तालुक्यातही तयारी सुरू करुया, कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो, असंही राम सातपुते म्हणाले. 

'माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'

"आपल्याला शांतीत क्रांती करायची आहे. आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊ. पुन्हा एकदा तालुक्यात महायुतीचा आमदार देऊ. काही जणांनी माझ्यावर टीका केली, काही जणांनी मला हिणवलं. पण माळशिरस तालुक्यातील जनतेला सांगतो, मागचे पाच वर्षे या तालुक्यातील जनतेची सेवा केली. तुमचा सालगडी म्हणून राहिलो, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत माझ्या शरिरात रक्ताचा थेंब आहे मी  या मातीत गाडून घेईन. तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही  माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार, असंही आमदार राम सातपुते म्हणाले. 

टॅग्स :ram satputeराम सातपुतेBJPभाजपाElectionनिवडणूक 2024