भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

By राकेश कदम | Updated: July 18, 2023 18:56 IST2023-07-18T18:56:09+5:302023-07-18T18:56:22+5:30

अश्लील व्हिडिओ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.

BJP leader Kirit Somaiya must be investigated Demand of Ajit Pawar faction |  भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

 भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

सोलापूर: अश्लील व्हिडिओ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांनी आजवर अनेक त्यांना आरोप केले. त्यांच्या तक्रारीमुळे अनेक नेत्यांची सीबीआय, इडीमार्फत चौकशी झाली. या अशा तक्रारीच्या प्रकरणातच त्यांची ख्याती होती. आज त्यांचा अश्लील व्हिडिओ समोर आला. हे प्रकरण चिंताजनक आहे. या अशा प्रकरणांमुळे सामान्य माणसाचा राजकीय नेत्यांवरचा राग वाढत आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होईल असे म्हटले आहे. या प्रकरणातील सोमय्या यांचीही चौकशी झाली पाहिजे असे पाटील म्हणाले.

Web Title: BJP leader Kirit Somaiya must be investigated Demand of Ajit Pawar faction