माझ्या डिजिटल शिक्षणाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा : रणजित डिसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:43 IST2021-01-20T12:43:01+5:302021-01-20T12:43:07+5:30
ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते रणजित डिसले यांची सोलापूर लोकमत भवनाला भेट

माझ्या डिजिटल शिक्षणाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा : रणजित डिसले
सोलापूर : माझ्या डिजिटल शिक्षणाच्या यशस्वी वाटचालीत लोकमतचा खूप मोठा वाटा आहे, अशी भावना ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते रणजित डिसले यांनी व्यक्त केली. ते सोलापुरात लोकमत भवनला भेट दिल्यानंतर बोलत होते.
यावेळी लोकमत परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, भारताला महासत्ता बनवायचे असेल तर डिजिटल युगातील शैक्षिणक क्रांती खूप झपाट्याने करणे गरजेचे आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरून मुलांना डिजिटल शिक्षणाची गोडी लावण्याचे काम मी करणार आहे. मला पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यातून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मी भारावून गेल्याचेही डिसले गुरुजी यांनी सांगितले.