शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

मोठी बातमी: सांगोला तालुक्यात तरुणाचा खून; संतप्त नातेवाईकांचा महूद -दिघंची रोडवर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 12:24 IST

मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद- दिघंची रोडवरील साठे नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रस्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

अरुण लिगाडे, सांगोला : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर, छातीवर, हातावर, पोटावर गंभीर वार करून ३२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना महूद (ता. सांगोला) येथील साठे नगर समाज मंदिराजवळ घडली.

सुनील अनिल कांबळे (३२ रा. महूद (साठे नगर ) ता सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पोलीस फौज फाट्यासह धाव घेऊन तातडीने संशयितांना ताब्यात घेतले.

दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावे, गुन्ह्यातील मास्टरमाइंडला शोधून काढावे या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद- दिघंची रोडवरील साठे नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रस्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. पोलीसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरPoliceपोलिस