शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; वाळूच्या व्यवसायातील लाभार्थ्यांना निलंबित करणार; राधाकृष्ण विखे-पाटलांची माहिती

By appasaheb.patil | Updated: October 4, 2022 12:49 IST

पंढरपूरच्या विकास आराखड्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नेमणूक होणार

पंढरपूर : अवैध वाळू उपसा मुळे अनेक माफिया तयार होत असून त्यांना अधिकारी व कर्मचारी मदत करत असतात. यामुळे वाळूच्या व्यवसायातील लाभार्थी बरेच आहेत. अशा लाभार्थ्यांना निलंबित करणार असल्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. शहाजीबापू पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

चंद्रभागा नदीपात्रात व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा राजरोसपणे सुरू असतो. त्याचबरोबर शहर व तालुका पोलीस ठाण्यात अवैध वाळू उपस्या बाबत गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामध्ये वाहन किंवा वाळू वाहतूक करणारे गाढवे पकडण्यात येते. परंतु वाळू माफियांचे नावेही निष्पन्न होत नाहीत व वाळू माफियांना पकडण्यात येत नाहीत. अशा घटनांमुळे वाळू उपसा करणाऱ्या लोकांचे मनोधर्य वाढते.

त्याचबरोबर मागील वर्षी नदीवरील नवीन पुलावरून पहाटेच्या वेळी वॉकिंग करत एक महिला व पुरुषाला वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पंढरपुरातील महाराज म्हणून ओळख असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची देखील काही काळासाठी मुख्यालयात बदली करण्यात आली होती. परंतु त्यास पुन्हा पंढरपुरात हजर करून घेण्यात आले आहे. त्याची नियुक्ती श्री विठ्ठल मंदिरला असताना देखील तो शहर पोलीस ठाण्यात काम करत आहे. अशा लोकांवर योग्य ती कारवाई झाली नसल्याने शहरात व तालुक्यात खुल्या वाळू उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. असल्याची माहिती पत्रकारांनी सांगितल्या नंतर वाळूच्या व्यवसायातील लाभार्थ्यांना निलंबित करणार असल्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

विकास आराखड्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी देणार...

पंढरपूर विकास आराखडा संदर्भात अनेक निवेदन आली आहेत. ज्या गावचा विकास करायचा आहे. त्याच गावाला माहीत नसेल काय होणार आहे. त्या विकासाचा काय उपयोग. सर्वांना एकत्र बोलावून पंढरपुरात बैठक घेऊ. या विकास आराखड्यासाठी प्रभारी अधिकारी असेल तर त्याला सर्व एजन्सींशी संपर्क ठेवणे अवघड जाते. यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी देणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPandharpurपंढरपूर