मोठी बातमी; सोलापूर शहरातील आठवडी बाजार, प्रदर्शने अन् उद्याने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:02 IST2020-10-21T21:02:29+5:302020-10-21T21:02:42+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; सोलापूर शहरातील आठवडी बाजार, प्रदर्शने अन् उद्याने सुरू होणार
सोलापूर : शहरातील आठवडी बाजार, व्यावसायिक प्रदर्शने, उद्याने सुरू करण्यास महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी परवानगी दिली.
आयुक्तांनी बुधवारपासून सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये सुरू करण्याचे आदेश दिले. मनोरंजन आणि करमणुकीसाठी उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागा सुरू राहतील. फक्त व्यावसायीक प्रदर्शने आयोजित करण्यास परवानगी असेल. आठवडा बाजार, जनावरांच्या बाजारासह सुरू करण्यास परवानगी राहील.
दरम्यान, शाळा व महाविद्यालये ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कायम आहेत. मात्र उच्च शिक्षण संस्थेत पीएडी आणि पदव्यूत्तर विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविभागातील प्रायोगिक शिक्षणास परवानगी असेल. प्रतिबंधीत क्षेत्रात या आस्थापनांना परवानगी नसेल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.