मोठी बातमी; कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:27 IST2021-01-29T13:21:10+5:302021-01-29T13:27:26+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मोठी बातमी; कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना लाच घेताना पकडले
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांना एक शस्त्रक्रिया करण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत पथकाने संबंधितांना ताब्यात घेतले असून जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास झाली.