मोठी बातमी; सुधीर हिरमेठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 15:57 IST2022-05-30T15:40:48+5:302022-05-30T15:57:39+5:30
मंगळवारी घेणार पदभार: हरिश बैजल मंगळवारी होणार सेवानिवृत्त

मोठी बातमी; सुधीर हिरमेठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार
सोलापूर : अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३१ मे रोजी विद्यमान पोलीस आयुक्त हरिश बैजल हे सेवानिवृत्त होत आहेत. सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आला आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९२ साली झाली. पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहरात सर्वत्र नवीन अधिकारी कोण येणार याची सुरू हाेती. वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असताना, सोमवारी अचानक आयपीएस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत.