मोठी बातमी; सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 16:17 IST2021-08-19T16:17:25+5:302021-08-19T16:17:29+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश : चार सहायक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

मोठी बातमी; सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
सोलापूर : ग्रामीण पोलीस दलातील चार सहायक पाेलीस निरीक्षक व ११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तोजस्वी सातपुते यांनी या बदल्या केल्या आहेत.
बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे कंसात बदली झालेले ठिकाण : नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अनंत महिपतराव कुलकर्णी (प्रभारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे), पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील सुरेश विठ्ठल निंबाळकर (प्रभारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील रामदास राजाराम शेळके (प्रभारी बार्शी शहर पोलीस ठाणे), अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कर्तव्यार्थ पोलीस निरीक्षक प्रदीप शिवाजी काळे (प्रभारी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे), कर्तव्यार्थी असलेले पोलीस निरीक्षक अरुण फुगे (तालुका पोलीस ठाणे), पोलीस कल्याण शाखेतील भागवत विठ्ठलराव मुंडे (नियंत्रण कक्ष), नियंत्रण कक्षातील मिलिंद भगवान पाटील (पंढरपूर तालुका पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील कल्लप्पा सोनू पुजारी (मंदिर सुरक्षा पंढरपूर), श्रीकांत अर्जुन पाडूळे (सायबर पोलीस ठाणे), जिल्हा वाहतूक शाखेतील धनंजय अनंतराव जाधव (पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील मनोजकुमार माधवराव यादव (कर्तव्यार्थ जिल्हा वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा) येथे बदली करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र संभाजी चौधरी यांची एटी सी कोर्ट पैरवी म्हणून बदली झाली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील मिठू नामदेव जगदाळे यांची करमाळा पोलीस ठाण्यात, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रवीण महादेव सपांगे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तर वाचक शाखेतील नीलेश शिवाजी तारू यांची करकंब पोलीस ठाण्यातील वाचक शाखेत बदली झाली आहे.