मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

By Appasaheb.patil | Updated: November 9, 2022 17:54 IST2022-11-09T17:53:56+5:302022-11-09T17:54:11+5:30

सोलापूर जिल्ह्यांतील १८९ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे.

big news; Polling for 189 gram panchayats of Solapur district on December 18 | मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यांतील १८९ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दुपारी प्रसिध्दीस दिली आहे. 

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, माढा, बार्शी, पंढरपूर, सांगोला, मोहोळ आदी तालुक्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Web Title: big news; Polling for 189 gram panchayats of Solapur district on December 18