मोठी बातमी; मुळेगांव रोडवर एकाचा खून; दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:04 IST2021-03-03T15:03:02+5:302021-03-03T15:04:25+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Big news; Murder of one on Mulegaon Road; Police suspect he was stoned to death | मोठी बातमी; मुळेगांव रोडवर एकाचा खून; दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांचा संशय

मोठी बातमी; मुळेगांव रोडवर एकाचा खून; दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांचा संशय

साेलापूर - येथील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगांव या गावातील रामचंद्र बिराजदार यांच्या शेतात मंगळवारी रात्री सुरेश बबन गायकवाड (वय २८ ) याचा अज्ञात व्यक्तींने अज्ञात कारणावरून खुन केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी दिली.

याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व त्यांच्या टीमकडून खुन करणार्यांचा तपास केला जाईल असेही शिंदे यांनी सांगितले. हा खून कोणी केला, कोणत्या कारणासाठी केला याबाबत लवकरच तपास लागेल असेही शिंदे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे डॉगस्काॅड घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Big news; Murder of one on Mulegaon Road; Police suspect he was stoned to death