मोठी बातमी; फटाके उडवण्याचा कारणावरून वृद्धाचा खून; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 10:14 IST2021-11-06T10:13:46+5:302021-11-06T10:14:11+5:30
उत्कर्ष नगर जवळील प्रकार : आरोपीचा शोध सुरू

मोठी बातमी; फटाके उडवण्याचा कारणावरून वृद्धाचा खून; सोलापुरातील घटना
सोलापूर : विजापूर नाका झोपडपट्टी नंबर - २ उत्कर्ष नगर येथील महापालिकेच्या शाळेजवळ फटाके उडवण्याचा कारणावरून वृद्धाचा खून झाला आहे. हा प्रकार पहाटे शनिवारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
खून झालेला वृद्ध इसमाचे घोडे आहेत. घोडे घराजवळ बांधले होते, शुक्रवारी रात्री ७ वाजता त्या ठिकाणी त्याच परिसरात राहणारे तरुण मुलं फटाके उडवत होते. फटाक्यांच्या आवाजाने आपले घोडे उधळेल म्हणून वृद्ध इसमाने त्याना विरोध केला होता. त्यामुळे वाद झाला होता. बराच वेळ वाद चालल्या नंतर पहाटे खून झाल्याचे समजते. खून झाल्याची माहिती समजताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनकुडे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली. संशयिताचा शोध सुरू असून या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होणार आहे.।