मोठी बातमी; प्रवेश रंगणार होता महेश कोठेंचा, पण हार घालून आले युवराज चुंबळकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:40 IST2021-01-08T17:39:45+5:302021-01-08T17:40:37+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; प्रवेश रंगणार होता महेश कोठेंचा, पण हार घालून आले युवराज चुंबळकर !
सोलापूर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा शुक्रवारी मुंबईत रंगणार होता. अचानक हा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला. यादरम्यान मनसेतून मागील वर्षी शिवसेनेत आलेले युवराज चुंबळकर यांच्यासह काही लोकांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. यापार्श्वभूमीवर कोठेंचा प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला होता. परंतु, यादरम्यान काही लोक राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईत पोहोचले होते. यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये प्रवेश सोहळा झाला. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले. यावेळी र राष्ट्रवादीचे मोहोळ चे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महिला शहर अध्यक्ष सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते.
यांनी केला प्रवेश
सलाम शेख, युवराज चुंबळकर, उमेश रसाळकर, राजमहेंद्र कमटम, बाबुराव जमादार, रियाज मोमीन, नितीन करवा, श्याम पंचारीया, परशुराम भिसे, युवराज सरवदे इत्यादींचा पक्ष प्रवेश पार पडला.