मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

By Appasaheb.patil | Updated: August 19, 2023 11:59 IST2023-08-19T11:45:48+5:302023-08-19T11:59:18+5:30

सोलापूर विभागातून धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसमधून शेकडो प्रवासी बेंगलोरला जातात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून बेंगलोरच्या दिशेने धावली.

Big news! Fire broke out in three air-conditioned coaches of Bangalore Express | मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मध्य रेल्वे विभागातील सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या बेगलोर एक्सप्रेसला शनिवारी सकाळी बेंगलोर स्थानकावर गाडीच्या तीन वातानुकूलित डब्यांना आग लागली.

दरम्यान, सोलापूर विभागातून धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसमधून शेकडो प्रवासी बेंगलोरला जातात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून बेंगलोरच्या दिशेने धावली. आज सकाळी बेंगलोर स्थानकावर थांबली असता वातानुकूलित डब्यांमधून धूर येऊ लागला.  त्यानंतर स्थानकावरील रेल्वेच्या अधिकार्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रेल्वेचे नुकसान झाले असून प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट झाले असून आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबतची सखोल चौकशी व तपासणी रेल्वेचे अधिकारी करीत आहेत.

Web Title: Big news! Fire broke out in three air-conditioned coaches of Bangalore Express