सोलापुरात मिनी लॉकडाऊन; भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:38 IST2021-04-05T18:40:56+5:302021-04-05T19:38:01+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Big news; Everything in Salelapur city will be closed except for essential services? | सोलापुरात मिनी लॉकडाऊन; भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार

सोलापुरात मिनी लॉकडाऊन; भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार

सोलापूर -  वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर शहरातील सर्व दुकाने उद्या मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेच्यावतीने काढण्यात आले आहेत.

दरम्यान, बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत. 

Web Title: Big news; Everything in Salelapur city will be closed except for essential services?