मोठी बातमी; दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 08:49 AM2021-11-17T08:49:01+5:302021-11-17T08:49:31+5:30

पंढरपूर पोलिसांनी केला करमाळा पोलिसांच्या स्वाधीन

Big news; Double murder suspect found in Pandharpur | मोठी बातमी; दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात

मोठी बातमी; दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात

googlenewsNext

पंढरपूर : करमाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात सापडला असून त्याला पंढरपूर पंढरपूर पोलिसांनी करमाळा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गु. र.क्र. १०१९/२०२१ मधील पाहिजे असलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात असल्याबाबत माहितीची सपोनि राजेंद्र मगदुम यांना प्राप्त झाली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरातील जावुन प्राप्त वर्णनाच्या संबंधित इसमाचा शोध घेतला. यावेळी तो इसम तुकाराम भवन जवळ कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आण्णा भास्कर माने (वय ४१, रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे असल्याचे सांगितले. त्यास करमाळा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि जगदाळे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: Big news; Double murder suspect found in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.