शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 12:11 IST

भीमा साखर कारखान्यावर तिसऱ्यांदा महाडिकांची सत्ता : सर्व उमेदवारांना साडेसहा हजार मताधिक्य

कुरुल : टाकळी सिंकदर येथील भीमा कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा महाडिक गटाची सत्ता आली आहे. चेअरमन तथा खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीतील सर्व १५ उमेदवार विजयी झाले आहेत. सरासरी साडेसहा हजार मताधिक्क्याने विजय मिळवत बचाव पॅनलचा धुव्वा उडवत महाडिकांनी मैदान मारलं आणि ‘पाटलांची पोरं’ चित झाली.

भीमा साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील वातावरण ढवळून निघाले होते. सोमवारी सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्यासाठी काडादी मंगल कार्यालयात मतमोजणीच्या एकूण दोन फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीतील मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज, पुळुजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रह्मपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनुर, पाटकुल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी, तारापूर या गावांतील बूथवरील मतदान २८ टेबलांवर मोजण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला वेगवेगळ्या रंगाच्या चिठ्ठ्या एकत्रित करण्याचे काम सुरू झाले. पहिल्या फेरीअखेर भीमा शेतकरी विकास आघाडीला ५,७४१ तर भीमा बचाव परिवर्तन पॅनलला २,१६४ मते मिळाली आहेत. महाडिक गट पहिल्या फेरीत भीमा बचाव पॅनलपेक्षा ३,५७७ मतांनी आघाडीवर होता. दरम्यान, संस्था प्रतिनिधी मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी ४३पैकी ३१ मते घेत १९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. विरोधी बचाव पॅनलचे राजेंद्र माने यांना ११ मते मिळाली.

दुसऱ्या फेरीत तुंगत, सुस्ते, अंकोली, अर्धनारी, इंचगाव, वडदेगाव, वाघोली, घोडेश्वर, शेजबाभूळगाव, येणकी, विरवडे बु., कोथाळे, कातेवाडी, कुरुल, सोहाळे, वडवळ, ढोकबाभूळगाव, पोखरापूर, गोटेवाडी, नजीक पिंपरी, पापरी, येवती, कोन्हेरी, खंडाळी, भीमा कारखाना कॉलनी (संस्था गट) अशी एकूण २८ टेबलांवर मतमोजणी झाली. दुसऱ्या फेरीअखेरही महाडिक गटातील सर्व उमेदवार सुमारे साडेसहा हजार मताधिक्क्याने विजयी झाले. पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच खा. धनंजय महाडिक मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा कार्यकर्त्यांची गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला.

.............

खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात विजयी झालेल्या उमेदवारांची गटनिहाय नावे व पडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत.

संस्था गट

  • धनंजय महाडिक : ३१

*पुळूज ऊस उत्पादक गट

  • विश्वराज महाडिक - १०६२९
  • बिभीषण वाघ - १०२३७

* टाकळी सिकंदर गट

  • संभाजी कोकाटे - १०५८८
  • सुनील चव्हाण - १०५६३

* सुस्ते गट

  • तात्या नागटिळक - १०७६४
  • संतोष सावंत - १०१३८

* अंकोली गट

  • सतीश जगताप - १०१९०
  • गणपत पुदे - १००३१

* कोन्हेरी गट

  • राजेंद्र टेकळे - १०५७१

* अनुसूचित जाती-जमाती गट

  • बाळासाहेब गवळी १०७४६
  • * महिला राखीव गट
  • सिंधू जाधव - १०७७८
  • प्रतीक्षा शिंदे - १०२९२

* इतर मागास प्रवर्ग गट

  • अनिल गवळी १०८६४

* भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग

  • सिद्राम मदने - १०७७८

...........

विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनलचे उमेदवार व पडलेली मते

  • देवानंद गुंड - ४१०३
  • कल्याणराव पाटील - ४१७२
  • शिवाजी भोसले - ४१७०
  • राजाराम माने - ३९७८
  • पंकज नायकोडे - ४२५१
  • विठ्ठल रणदिवे - ३९८४
  • भारत पवार - ३९९५
  • रघुनाथ सुरवसे - ३८६५
  • कुमार गोडसे - ४३७४
  • भारत सुतकर - ४२१७
  • अर्चना घाडगे -४१४१
  • सुहासिनी चव्हाण - ४०२२
  • राजाभाऊ भंडारे - ४१५९
  • राजू गावडे - ४१४९
  • राजेंद्र माने : ११

 

टॅग्स :SolapurसोलापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकPoliticsराजकारण