मोठा अपघात! कर्नाटकात ट्रकखाली येऊन कारचा चुराडा; सोलापूर जिल्ह्यातील सहा जण जागीच ठार

By Appasaheb.patil | Updated: May 29, 2023 13:22 IST2023-05-29T12:18:52+5:302023-05-29T13:22:41+5:30

दक्षिण साेलापूर तालुक्यातील लवंगी येथील कांबळे हे पंधरा दिवसापूर्वी गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते.

Big news! Car rams into truck in Karnataka; Six people from Solapur district were killed on the spot | मोठा अपघात! कर्नाटकात ट्रकखाली येऊन कारचा चुराडा; सोलापूर जिल्ह्यातील सहा जण जागीच ठार

मोठा अपघात! कर्नाटकात ट्रकखाली येऊन कारचा चुराडा; सोलापूर जिल्ह्यातील सहा जण जागीच ठार

सोलापूर : कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली. यात पती-पत्नी, लहान मुलांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सोमवारी सकाळी ग्रामस्थांकडून समजली.   

दक्षिण साेलापूर तालुक्यातील लवंगी येथील कांबळे हे पंधरा दिवसापूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ते बंगळुरू येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. रविवारी ते बंगलोरला जाण्यासाठी आपल्या कारमधून दोन मुलं व पत्नीसह जात होते.  

कांबळे हे नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाईकांना घेऊन तो पुढील प्रवासासाठी निघाले. हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. अपघात इतका भयंकर होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्नाटक पोलिस घटनास्थळावर पोहोचले असून जखमींना वेळेत उपचारासाठी पोहोचविण्यासाठी मोठी मदत केली.

Web Title: Big news! Car rams into truck in Karnataka; Six people from Solapur district were killed on the spot