मोठी बातमी; कार अन् एसटी बसचा भीषण अपघात; दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 21:22 IST2021-11-28T21:21:18+5:302021-11-28T21:22:26+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; कार अन् एसटी बसचा भीषण अपघात; दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार जण जागीच ठार
सोलापूर : एसटी आणि कार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याची माहिती समोर येत आहे.
कार गाडी एमएच 13 सीएस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक केए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाल्याचं सांगण्यात आले आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.