मोठी बातमी; राज्यपालांच्या कॅनव्हाला दाखविले सोलापुरात काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 13:18 IST2022-03-04T13:17:19+5:302022-03-04T13:18:09+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Black flags displayed at the Governor's canvas in Solapur | मोठी बातमी; राज्यपालांच्या कॅनव्हाला दाखविले सोलापुरात काळे झेंडे

मोठी बातमी; राज्यपालांच्या कॅनव्हाला दाखविले सोलापुरात काळे झेंडे

सोलापूर : शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॅनव्हाला सोलापुरात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. ही घटना सोलापूर-पुणे रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सोलापुरात कार्यक्रमानिमित्त आले होते. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांनी त्यांच्या सोलापूर दौर्याला विरोध केला होता, शिवाय आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासूनच विमानतळ ते आसरा चौक व आसरा चौक ते सोलापूर विद्यापीठ मार्गावर पोलिसांनी दुर्तफा बंदोबस्त तैनात केला होता. कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली होती, मात्र राज्यपालांचा कॅनव्हा सोलापूर विद्यापीठ परिसरात येताच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखविले. 

Web Title: Big news; Black flags displayed at the Governor's canvas in Solapur