मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:08 IST2020-12-21T12:07:55+5:302020-12-21T12:08:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध
सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक निबंधक एस. तांदळे यांनी कारखाना स्थळावर संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.