मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 11:47 AM2022-05-04T11:47:54+5:302022-05-04T11:48:00+5:30

सोलापूर शहर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांंना ताब्यात घेतले.

Big news; Attempt to place Hanuman Chalisa in front of the mosque on behalf of MNS in Solapur | मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

Next

सोलापूर : सोलापुरात मनसेच्यावतीने दत्त चौकातील सोन्या मारूती गणपती मंदिरासमोरील मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांंना ताब्यात घेतले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमजान ईद नंतर ४ मे २०२२ पासून महाराष्ट्रातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजू देणार नाही असा इशारा दिला होता, जर भोंगे वाजले तर त्या समोर त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवू असे त्यांनी सांगितले होते.  त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांनी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे, यांनी सोन्या मारुती व  गणपती समोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता, त्या पद्धतीने भोंगे ऍम्प्लिफायर लावण्यात आले होते, मात्र पोलिसांनी भोंगे वाजल्यापासून त्यांना रोखले आणि सर्व साहित्य जप्त केलं. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालीसा म्हणून राज ठाकरे यांच्या हाकेला साथ दिली.

Web Title: Big news; Attempt to place Hanuman Chalisa in front of the mosque on behalf of MNS in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.