मोठी बातमी; सराव सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात सोलापूरच्या अंजली चिट्टे हिचा समावेश
By Appasaheb.patil | Updated: September 12, 2022 17:34 IST2022-09-12T17:33:54+5:302022-09-12T17:34:49+5:30
उद्या होणार पुण्याला रवाना; पुढील सामने होणार अहमदाबादला

मोठी बातमी; सराव सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात सोलापूरच्या अंजली चिट्टे हिचा समावेश
सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची १९ वयोगटातंर्गत खेळणारी महिला खेळाडू व कर्णधार अंजली चिट्टे हिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात सराव सामना खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापुरात झालेल्या सामन्याच्या परफॉर्मवर तिची निवड झाली आहे. चिट्टे ही उद्या मंगळवार १३ सप्टेंबर २०२२ रोजी पुण्याला रवाना होणार असून पुढील सामने अहमदाबाद येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी लोकमत शी बोलताना दिली. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने २८ ऑगस्ट २०२२ रोजी १९ वयोगटातील संघाची घोषणा केली होती. त्या संघात अंजली चिट्टे हिची कर्णधार पदी निवड करण्यात आली होती. चिट्टे हिने आजपर्यंत विविध सामन्यात आपली योग्य खेळी दाखवित सोलापूरचे नाव उंचावले होते. चिट्टे हिला निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, स्नेहल जाधव, किरण मनियार यांच्यासह अन्य असोसिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले होते.