शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर पुण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 15:48 IST

पिडीत महिलेने केलेल्या तक्रारीची घेतली दखल

सोलापूर : पिडीत महिलेनेच्या केलेल्या तक्रारीवरून भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती लोकमत ला मिळाली आहे.

श्रीकांत देशमुख  यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केला होतं. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली  होती. या नंतर देशमुख यांनी पदावरचा राजीनामा दिला होता. आता या सर्व प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून श्रीकांत देशमुखांचा फोन लागत आहे. 

--------------

भाजपच्या आणखी एका जिल्हाध्यक्षाविरुद्ध 

सोलापुरातील पीडितेची महिला आयाेगाकडे धाव

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे बेडरूममधील व्हिडिओ प्रकरण ताजे आहे. त्यातच साेलापुरातील एका महिलेने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश माेहिते यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयाेगाकडे केली आहे. साेलापुरातील महिलेने ६ मे २०२२ राेजी नवी मुंबई पाेलीस आयुक्तांकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीत म्हटले हाेते की, माझा २०११ मध्ये अलिबाग जि. रायगड येथील एका व्यक्तीशी विवाह झाला हाेता. काही वर्षांतच घटस्फाेट झाला. यानंतर माझी महेश माेहिते यांच्याशी मैत्री झाली. आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांनी त्यांचा घटस्फाेट झाल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यासाेबत मी ६ ऑक्टाेबर २०१५ राेजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला. यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माझ्यावर अत्याचार झाला. माझा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकीही दिली. मला व माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धाेका असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले हाेते. या महिलेने राज्य महिला आयाेगाकडे एप्रिल महिन्यात तक्रार केली हाेती. श्रीकांत देशमुख यांचे प्रकरण समाेर आल्यानंतर या महिलेने शनिवारी पुन्हा महिला आयाेगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि साेलापूर पाेलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले याबद्दल कळवावे अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी