शेतकºयांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:16 IST2020-05-05T21:14:46+5:302020-05-05T21:16:55+5:30

माल वाहतुकीला परवानगी; कृषी दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार

A big decision was taken by the District Collector of Solapur for the farmers | शेतकºयांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय

शेतकºयांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये आता शेतीमालाची किरकोळ विक्री, विविध यंत्रसामुग्री व उपकरणांच्या विक्रीला परवानगी शेतातील कापणी व पीक काढणीनंतरची प्रक्रिया, पेरण आणि इतर कामांसाठी मजुरांची वाहतुकीला परवानगी

सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी शेतकºयांसाठी मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. शेती मालाच्या वाहतुकीला पूर्णपणे मोकळीक दिली असून, कृषी बियाणे, खते, औजारे विक्री व दुरूस्तीची दुकाने आता पूर्णवेळ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.


पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे शेतकºयांची कामे कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे अशी मागणी होत होती. याचा विचार करून राज्याच्या मुख्य सचिवांनी लॉकडाऊन काळात कृषी उत्पादन, वितरण व वाहतुकीबाबत मुक्त परवानगी द्यावी व शेतीमालाच्या विक्रीबाबत आवश्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मंगळवारी दुपारी कृषी उत्पादन, वितरण व वाहतुकीच्या मुक्त परवानगीबाबत विशेष आदेश जारी केला.


अशा आहेत नियम व अटी

लॉकडाऊनमध्ये आता शेतीमालाची किरकोळ विक्री, विविध यंत्रसामुग्री व उपकरणांच्या विक्रीला परवानगी देण्यात येत आहे. शेतातील कापणी व पीक काढणीनंतरची प्रक्रिया, पेरण आणि इतर कामांसाठी मजुरांची वाहतुकीला परवानगी देण्यात येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र, यंत्र दुरूस्तीची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. कृषी व कृषीपूरक उद्योगासाठी लागणारे मजूर, कर्मचारी, दुकानदारांसाठी कृषी अधिकारी पास देतील व हा पास पोलीस ग्राह्य धरतील. दुकाने सुरू, शेतीमालाची वाहतूक व कामासाठी मजूर लावताना फिजीकल डिस्टन, मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. 

Web Title: A big decision was taken by the District Collector of Solapur for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.