सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:25 IST2025-12-18T12:20:50+5:302025-12-18T12:25:17+5:30
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे भाजपात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने व नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला.
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून दिलीप आणि यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती मात्र त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचे राजकीय नेत्यांनी सांगितले.