सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन

By राकेश कदम | Updated: October 31, 2023 10:30 IST2023-10-31T10:29:33+5:302023-10-31T10:30:21+5:30

सकल मराठा समाजाच्या वतीने असा कोणताही बंद घोषित केलेला नाही.

beware of solapur bandh rumours misleading posts an appeal to the sakal maratha community | सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन

सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन

राकेश कदम, सोलापूर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. समजणे कोणत्याही प्रकारे सोलापूर बंद ची हाक दिलेली नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या सोलापूर बंदच्या पोस्ट केवळ अफवा आहेत. त्यापासून सावध रहा असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी केले.

पवार म्हणाले, कालपासून समाज माध्यमांवर  'महाराष्ट्र बंद ' अश्या पोस्ट फिरत आहेत. वास्तविक पाहता , ह्या पोस्ट उस्फूर्तपणे कांहीं मराठा आंदोलक फिरवत आहे. परंतु  महाराष्ट्र भर जे मराठा आरक्षण आंदोलने चालू आहेत, ती सर्व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने शांतता पूर्ण मार्गाने चालू आहेत.  सध्या फक्त जरांगे पाटील हेच मराठा समाजाचे नेते आहेत. जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बंद अशी कोणतीही हाक दिली नाही.  सध्या शाळा महाविद्यालयात सहामाही च्या परीक्षा चालू आहेत. कांहीं पालक , शाळा आणि शिक्षक  द्विधा मनस्थितीत आहेत. कांहींना परगावी जायचे आहे.

सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा असे अधिकृतपणे जाहीर करतो की सकल मराठा समाजाच्या वतीने असा कोणताही बंद घोषित केलेला नाही.

Web Title: beware of solapur bandh rumours misleading posts an appeal to the sakal maratha community