Breaking; सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका
By Appasaheb.patil | Updated: September 11, 2020 15:28 IST2020-09-11T14:48:55+5:302020-09-11T15:28:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका
सोलापूर : सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, त्याची गरज भासणार नाही़ मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियावर फिरणाऱ्या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वाºयासारखी पसरत आहे. त्याला सोशल मिडियातून दुजोरा मिळत होता, मात्र शुक्रवारी सकाळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, तशी गरजही भासणार नसल्याचे सांगितले.
याशिवाय महापौर श्रीकांचना यन्नम यांनीही लॉकडाऊन पुन्हा होणार नसल्याची माहिती दिली. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावतीने राष्ट्रवादीचे संतोष पवार यांनीही सोलापुरात लॉकडाऊन होणार नसल्याची माहिती शुक्रवारी व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती.