करमाळ्यातील अतिक्रमण मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:47+5:302021-04-10T04:21:47+5:30
नगर परिषदेकडून जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे शहरातील अतिक्रमण २६ मार्चपर्यंत स्वत:हून काढून घेण्याबाबत कळवले होते. याबाबतचे संदेशही लाऊड स्पीकरवरून दिले. ...

करमाळ्यातील अतिक्रमण मोहिमेला सुरुवात
नगर परिषदेकडून जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे शहरातील अतिक्रमण २६ मार्चपर्यंत स्वत:हून काढून घेण्याबाबत कळवले होते. याबाबतचे संदेशही लाऊड स्पीकरवरून दिले. तरीही ते स्वत:हून न काढल्याने धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जीन मैदानसमोरील फेरीवाला झोनमधील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत नागर परिषदेकडून चार टपऱ्या काढल्या आहेत. टप्याटप्याने शहरातील सर्व भागातील अतिक्रमित टपऱ्या व अतिक्रमित पत्राशेड काढण्यात येणार आहे, याची अतिक्रमणधारकांनी नोंद घ्यावी. तसेच नगर परिषदेच्या अतिक्रमण हटावाच्या कटू कारवाईस सामोरे न जाता स्वतःहून ते काढून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.
अतिक्रमण मोहीम पथकात निखिल गुरसाळे, अश्विनी पाटील, समीर नदाफ, स्वाती माने, जब्बार खान, फिरोज शेख, विनोद राखुंडे व सर्व विभागातील कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचारी शेलार व टाकले हे सहभागी झाले होते.
फोटो
०९करमाळा०१
ओळी : फेरीवाला झोन मधील टपऱ्यांचे अतिक्रमण काढताना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार व अतिक्रमण पथक.