पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: August 7, 2023 18:43 IST2023-08-07T18:43:21+5:302023-08-07T18:43:38+5:30
पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू
सोलापूर: पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विकास बबन पवार (वय- ४२, वेताळनगर, तुळजापूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोटदुखीवर प्राथमिक उपचार करुन त्यांना रविवारी सायंकाळी सोलापूरकडे आणण्यात येत होते.
हगलूर गावाजवळ ते बेशुद्ध पडले. शासकीय रुग्णालयात पुतण्या अविनाश याने दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.