शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

'उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 17:44 IST

भरणे यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक्त केला होता

ठळक मुद्देभरणे यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक

सोलापूर - राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका उद्यानाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात 'मुख्यमंत्र्याचं मरू द्या, जाऊ द्या' असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं. त्यानंतर, सोलापुरातील शिवसैनिकांनी सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसैनिकांचा रोष पाहता भरणे यांनीदेखील तात्काळ दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणही दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी सांगितलं. 

सोलापूरातील एका कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी बोलताना, दादा मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला काय द्यायचाय तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या असे म्हटले. दरम्यान, महापौरांनी निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांच जाऊ द्या, मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर, पुढे सारवासारव करत, आपण मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घेऊ, असेही ते म्हणाले. 

भरणे यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक्त केला होता. माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणेंनी औकातीत राहावे, अशा शब्दात दम भरला. 

उजनी ओलांडू देणार नाही - सावंत

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. सोलापूर जिल्ह्याची बाँड्री, तुम्हाला उजनी धरण ओलांडू देणार नाही, ही शिवसैनिकांची ताकद एका क्षणात तुम्हाला दाखवू शकतो. फक्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेश आणि महाविकास आघाडीचं बंधन आम्ही पाळत आहोत, असा इशाराच तानाजी सावंत व्हिडिओतून दिला.

भरणेंकडून दिलगिरी व्यक्त

मुख्यमंत्र्यांविषयी विधान अवधानाने झाले. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवसैनिकांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यामध्ये, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, आमचे सर्वांचे नेते आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कामही खूप चांगलंय, असे म्हणत भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाTanaji Sawantतानाजी सावंतNCPराष्ट्रवादी काँग्रेस