विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना
By रूपेश हेळवे | Updated: July 22, 2023 13:10 IST2023-07-22T13:10:28+5:302023-07-22T13:10:36+5:30
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना
सोलापूर : माझ्या विरूध्द साक्ष देतो का म्हणत तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री रिमांड होमच्या बोळात झाली आहे. यात दिपक राजेंद्र माशाळ ( वय ३५, रा. न्यू पाच्छा पेठ, पाथरूट चौक) हा तरुण जखमी झाला आहे.
दिपक हा घटनास्थळावरून जात असताना काही जण त्याच्या जवळ आले त्यांनी तू आमच्या विरूध्द साक्ष देतो का म्हणत त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. शिवाय चटणी टाकून मारहाण केली. यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.