शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांना तोड देणारी बासलेगावची ज्ञानदान एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:30 IST

चला.. चला.. चला..; शिक्षणवारीची बस आली, सारे शिकुया, पुढे जाऊया...

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाच्या भडिमाराने आजच्या युगात सगळेच हायस्पीड झाले आहेत.मागील काही महिन्यांपूर्वी शाळेचे रूप बदलण्याच्या हेतूने उपलब्ध वास्तूला एस.टी.चे रूप देण्यात आले.

शंभुलिंग अकतनाळचपळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या भडिमाराने आजच्या युगात सगळेच हायस्पीड झाले आहेत. मग अशा वेळी शिकणारा विद्यार्थीदेखील मागे कसा राहील ? ही गरज ओळखून पालकवर्ग आपल्या पाल्यास अधिक हुशार करण्यासाठी वाट्टेल ते या तत्वावर इंग्रजी मीडियमच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतात. मात्र ग्रामीण भागातील पालकवर्ग अनेक संकटांच्या विळख्यात सापडल्यानंतर बासलेगाव, ता.अक्कलकोट येथील जिल्हा परिषद शाळेने  सर्वांगीण विकासासाठी चक्क ज्ञानदानाची एसटीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्याने येथील पालकांना मोठा आधार मिळाला आहे. 

हल्ली पालक वर्गामध्ये इंग्रजी शाळेविषयी वाढलेल्या आस्थेने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना अवकळा आली आहे. मग अशा कठीणप्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता किरनळ्ळी यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालसिंगराव राठोड आणि पालकांच्या सहकार्याने दर महिन्याला बैठका आयोजित करतात. यातून शालेय विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजन आखले जाते. याचाच एक भाग म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी शाळेचे रूप बदलण्याच्या हेतूने उपलब्ध वास्तूला एस.टी.चे रूप देण्यात आले.याकामी लोकसहभागातून जवळपास पंधरा हजारांचा खर्च करण्यात आला. आणि तयार झाली....बासलेगावची ज्ञानदान एक्स्प्रेस...!

आजच्या घडीला या शैक्षणिक  बसच्या प्रतिकृतीतून ऐंशी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे दिले जातात. पहिलीपासून सातवीपर्यंत शिक्षण देण्यासाठी मनोज कदम आणि कल्पना मोरे हे कृतिशील शिक्षक सतत कार्यशील असतात. मुख्याध्यापिका सुनीता किरनळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेत वर्षभर सतत उपक्रम पार पडतात. यामध्ये प्रामुख्याने थोर नेत्यांची जयंती-पुण्यतिथी, रॅली,कार्यानुभवाच्या माध्यमातून स्वनिर्मिती, विविध स्पर्धा, परिपाठ आणि विधायक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्याचे धडे दिले जातात.

या डिजिटल शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणेशिक्षण मिळत असल्याने पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते.तसेच येथील शिक्षकदेखील सतत धडपडत असतात.लोकसहभागातून या शाळेत संगणक संच उपलब्ध आहे.यातून ग्रामीण भागातील मुले स्वत: हा संच हाताळतात. मराठी माध्यमाच्या शाळांची अवकळा दूर करण्यासाठी बासलेगाव, ता.अक्कलकोट येथील शाळेने नवोपक्रमातून विद्यार्थी व पालकांना आकर्षित केले आहे.याच अनुषंगाने इतर शाळांनीदेखील असे उपक्रम राबविल्यास भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना अच्छे दिन लवकरच येतील.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी