राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:20 IST2019-03-26T13:18:23+5:302019-03-26T13:20:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस स्टार नेत्यांची यादी जाहीर केली.

राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश
बार्शी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस स्टार नेत्यांची यादी जाहीर केली असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप सोपल यांचा या यादीत समावेश केला आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खा़ सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, शंकरसिंग वाघेला आदी नेत्यांचा समावेश आहे़ यामध्ये यंदा आ़ दिलीप सोपल यांचेही नाव आहे.
आ. दिलीप सोपल हे सुरुवातीपासूनच एक पट्टीचे वक्ते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. हजरजबाबीपणा व मिस्कील शैली यासाठी त्यांना ओळखले जाते. राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्यावर खरी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे उस्मानाबाद लोकसभेची़ उस्मानाबाद लोकसभेचा प्रचार करताना त्यांना बार्शी तालुक्यात देखील प्रचार करावा लागणार आहे़