शहरं
Join us  
Trending Stories
1
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
2
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
3
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
4
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
5
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
6
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
7
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
8
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
9
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
10
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
11
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
12
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
13
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
14
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
16
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
17
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
18
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
19
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
20
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बैतुलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:38 IST

‘औरतों के लिए, औरतों के जरिए’ ; सोलापुरातील पस्तीस जणींचा सहभाग; गरजूंना शिलाई मशीन वाटप

ठळक मुद्देलष्कर परिसरात राहणाºया निवृत्त शिक्षिका चाँद सुलताना सय्यद यांना ही कल्पना सुचलीमुस्लीम समाजात अनेकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीतमदतीसाठी बैतुलमालच्या माध्यमातून मदत गोळा केली जाते

सोलापूर : आपल्या कमाईतील थोडासा भाग समाजाच्या कल्याणासाठी, गरजूंसाठी देण्याची रीत इस्लाममध्ये आहे. याला ‘बैतुलमाल’ असे म्हणतात. बैतुलमाल पुरुषच करत असतात. मात्र देशात बहुधा पहिल्यांदा महिलांकडूनमहिलांसाठी बैतुलमाल करण्याची सुरुवात     सोलापुरातील महिलांनी केली आहे. ‘औरतोंका बैतुलमाल औरतों के लिए औरतों के जरिए’ या संकल्पनेवर याची स्थापना करण्यात आली आहे. यात सोलापुरातील ३५ महिलांचा समावेश आहे.

लष्कर परिसरात राहणाºया निवृत्त शिक्षिका चाँद सुलताना सय्यद यांना ही कल्पना सुचली. मुस्लीम समाजात अनेकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांच्या मदतीसाठी बैतुलमालच्या माध्यमातून मदत गोळा केली जाते. या बैतुलमाल मुख्यत: पुरु षच चालवत असतात. महिलांनादेखील मदतीची गरज असते. बैतुलमाल पुरुषच चालवत असल्याने त्या मदतीसाठी कुठे जात नाहीत. जर महिलांसाठी महिलांकडूून बैतुलमाल सुरु केला तर अशा गरजू महिलांना मदत करणे सोयीचे होईल या विचाराने महिलांसाठी बैतुलमालची स्थापना करण्यात आली. फक्त मुस्लीम नव्हे तर इतर धर्मांतील महिलांनाही मदत केली जाते. 

अशा गरजेसाठी होते मदत... - चाँद सुलताना सय्यद या २००६ साली आपल्या स्वत:च्या पैशातून मदत करत होत्या. अपंगांना मदत करणे, गरजूंना धान्य देणे, महिलांच्या बचत गटांचे पैसे भरणे, मुलांच्या शाळेची फी भरणे, वीज बिल भरणे आदी मदत त्या स्वत:च्या पैशाने करत होत्या. जर महिलांसाठी बैतुलमाल सुरु केल्यास महिला कोणतीही शंका मनात न ठेवता मदत मागतील व त्यांना अशी मदत करणेही सोपे जाईल, या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली. बैतुलमालच्या माध्यमातून रमजान महिन्यात जकात गोळा केली जाते. यातून गरजवंतांना मदत केली जाते.

माझे वय सध्या ६० आहे. माझ्यानंतर गरजू महिलांना मला मदत करता येणार नाही. याचा विचार करुन गरजूंना फक्त धान्य आदींची मदत न करता त्यांना स्वत:च्या पायावर उभे करावे असा विचार आला. त्यातूनच विधवा व घटस्फोटित महिलांना मोफत शिलाई यंत्र देण्याचा उपक्रम घेत आहे. बैतुलमालमधील पैसे व माझ्या निवृत्ती वेतनातील काही भाग याचा वापर मी मदतीसाठी करत आहे. - चाँद सुलताना सय्यद,  निवृत्त शिक्षिका़

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमWomenमहिलाjobनोकरी