शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूृवाडीत रेल्वे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची आ़ बबनराव शिंदे यांची मागणी, शरद पवार यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:08 IST

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला आवश्यक ते काम मिळावे, विस्तारीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध व्हावा व मुख्य म्हणजे येथे मालवाहतूक डब्याचा कारखाना असून येथे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना व्हावा या मागणीसाठी आ. बबनदादा शिंदे हे शिष्टमंडळासह खा.शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपरेल येथील रेल्वेचा कोच कारखाना बंद करण्यात आला आहे़ त्याचा पूर्णपणे वर्कलोड कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला द्यावा जेणेकरुन कुर्डूवाडी शहराच्या वैभवात भर पडेल.कुर्डूवाडी शहरात रेल्वेची सुमारे ११५ एकर जागा आहे व आरपीएफ ट्रेनिंग सेंटर चिंकहील हे बंद झाले असून त्याचीही ११० एकर जागा आहेकुर्डूवाडी येथे कोच बनविण्याच्या कारखान्याची मागणी असताना देखील लातूर येथे नवीन कारखाना काढण्यात आल्याने कुर्डूवाडीकरांवर अन्याय झाला असल्याची खंत ही आ.शिंदे यांनी बोलून दाखवली

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि २३  : कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला आवश्यक ते काम मिळावे, विस्तारीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध व्हावा व मुख्य म्हणजे येथे मालवाहतूक डब्याचा कारखाना असून येथे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना व्हावा या मागणीसाठी आ. बबनदादा शिंदे हे शिष्टमंडळासह खा.शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.    विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, परेल येथील रेल्वेचा कोच कारखाना बंद करण्यात आला आहे़ त्याचा पूर्णपणे वर्कलोड कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला द्यावा जेणेकरुन कुर्डूवाडी शहराच्या वैभवात भर पडेल, येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  कुर्डूवाडी शहरात रेल्वेची सुमारे ११५ एकर जागा आहे व आरपीएफ ट्रेनिंग सेंटर चिंकहील हे बंद झाले असून त्याचीही ११० एकर जागा आहे.  अद्ययावत रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे शाळा, मुबलक पाणी, विजेची सोय, कर्मचाºयांना राहण्यासाठी घरे अशा विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत.    कुर्डूवाडी हे रेल्वे जंक्शनचे ठिकाण असून मिरज-लातूर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-चेन्नई यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे़ त्यामुळे येथे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध आहेत़ कुशल कामगार वर्ग येथे उपलब्ध आहे़ शहरापेक्षा कमी मजुरीत मजूर उपलब्ध होऊ शकतात़ यामुळे प्रवासी डब्यांची प्रोडक्शन कॉस्ट मुबलक कमी होऊ शकते़ निधी उपलब्ध नसल्यामुळे आपण खा. शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.----------------------------लातूरच्या कारखान्याला विरोध नाही - कुर्डूवाडी येथे कोच बनविण्याच्या कारखान्याची मागणी असताना देखील लातूर येथे नवीन कारखाना काढण्यात आल्याने कुर्डूवाडीकरांवर अन्याय झाला असल्याची खंत ही आ.शिंदे यांनी बोलून दाखवली.  लातूर येथील कारखान्याला आमचा विरोध नाही; मात्र आमची मागणीही जुनी असून आमच्यावर अन्याय होत असल्याचेही आ़ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविले.

टॅग्स :SolapurसोलापूरBabanrao Shindeबबनराव शिंदे