Baap Re .... 46 students from the same school corona positive; Incidents in South Taluka | बाप रे....एकाच शाळेतील ४६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; दक्षिण तालुक्यातील घटना

बाप रे....एकाच शाळेतील ४६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; दक्षिण तालुक्यातील घटना

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मतिमंद निवासी विद्यालयातील ४६ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.

शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंत्रोळी येथील मतिमंद शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत जिल्ह्यातून बरेच विद्यार्थी दाखल झाले, येथील काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी चाचणी करण्यात आली असता २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गुरुवारी पुन्हा विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असता एकूण 46 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

निवासी विद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोना होण्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्हा आरोग्य विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव हे आरोग्य पथकासह अंत्रोळीला रवाना झाले आहेत. शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या आठवड्यापासून वाढत आहेत. शाळांमध्येही विद्यार्थ्यांची दहा टक्के संख्या घटली होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी बैठक घेऊन ७ मार्चपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.

Web Title: Baap Re .... 46 students from the same school corona positive; Incidents in South Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.