ट्रक व दुचाकीच्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 21:56 IST2020-08-17T21:55:00+5:302020-08-17T21:56:34+5:30
पाच वर्षाचा मुलगा झाला पोरका; ट्रक व दुचाकीचा झाला अपघात

ट्रक व दुचाकीच्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना
सोलापूर : दमाणी शाळेजवळील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहणारे नागनाथ लिंगप्पा गगनहळ्ळी (वय ६५) हे त्यांची मुलगी सपना शितल विभुते (वय ३६) हिच्यासह दुचाकीवरुन निघाले होते. हैदराबाद रोडवरील पर्ल गार्डनसमोर तुळजापूर रोड बायपासला वळण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला गॅस सिलेंडर घेऊन उस्मानाबादकडे निघालेल्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये सपना यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात नागनाथ गगनहळ्ळी यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, सपना त्यांच्या वडिलांसह काही कामानिमित्त दुचाकीवर बाहेर गेल्या होत्या. तुळजापूर रोड बायपासला वळण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला ट्रकने (एमएच- २५, बी- ९९७७) धडक दिली. त्यामध्ये सपना खाली पडल्या. त्यांच्या डोकीस, पायाला गंभीर दुखापत झाली. वडिलांनाही जबर मार लागला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचालक पांडूरंग नामदेव शिंदे (रा. बेंबळे, ता. तुळजापूर) याला ताब्यात घेतले आहे.