कात्रीने वार करत, अंगावर कार घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By रूपेश हेळवे | Updated: July 2, 2023 15:50 IST2023-07-02T15:49:57+5:302023-07-02T15:50:35+5:30

जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

attempt to kill by stabbing with scissors | कात्रीने वार करत, अंगावर कार घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

कात्रीने वार करत, अंगावर कार घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

रूपेश हेळवे, सोलापूर : तरुणावर कात्रीने वार करत त्याच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावनकुमार ढंगापूरे ( रा. सोलापूर ) याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना अशोक चौक परिसरात घडली. यात दिपक वैजनाथ जाधव ( वय ३२, रा. लोणार गल्ली चौपाड) हे जखमी झाले आहेत.

आरोपी ढंगापूरे याने अशोक चौकातील एका शोरूममध्ये कामाला असणार्या दीपक जाधव याच्या शोरूम मध्ये गेला. तेथे जाऊन त्याने पत्नीसोबत संबध असल्याच्या संशयावरून तुला खल्लास करतो म्हणत त्याच्या जवळील कात्रीने दिपकच्या छातीवर वार केले. यात दिपकच्या छातीच्या डाव्या बाजूस, डाव्या बरगडीला, पोटाला, दंडाला, मनगटाजवळ व पाटीवर भोसकले. यात दिपक गंभीर जखमी झाला, अशा आशयाची फिर्याद जखमी दिपकचा मित्र परमेश्वर ज्ञानेश्वर दिवटे ( वय ३४, रा. रानमसले, उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सावनकुमार ढंगापूरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई बादोले करत आहेत.

Web Title: attempt to kill by stabbing with scissors