हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 14:55 IST2018-04-27T14:55:21+5:302018-04-27T14:55:21+5:30

महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या 15 दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

Attempt to Obtain OBC Certificate to Hindu Lingayat | हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आश्वासन

हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आश्वासन

सोलापूर-  महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या 15 दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
होटगी मठाच्या वतीने येथील वीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1008 शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पालक मंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी व काशी, श्रीशैल, उज्जैन पीठाचे जगद्गुरू उपस्थित होते. 
पालक मंत्री देशमुख यांच्या मागणीवरून फडणवीस म्हणाले की, राज्यातील हिंदु लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर करण्यासाठी या बाबतचा विषय ओबीसी आयोगाकडे पाठविण्यात येईल. लिंगायत समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा दिलीच आहे. या स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेण्यात येईल.
 

Web Title: Attempt to Obtain OBC Certificate to Hindu Lingayat