लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, तरुणावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: June 21, 2023 15:43 IST2023-06-21T15:42:09+5:302023-06-21T15:43:27+5:30

गुन्हा दाखल झाला आहे.

atrocities by lure of marriage and crime against youth | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, तरुणावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, तरुणावर गुन्हा

रूपेश हेळवे, सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. अत्याचार प्रकरणी कादर सैदु हांडे ( रा. कुमठा नाका) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसापूर्वी पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. त्या ओळखीतून दोघे एकमेकांना फोनमधून बोलत होते. दरम्यान, आरोपीने पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने पीडितेला जेवण्यासाठी जाऊ असे सांगून तिला आपल्या दुचाकीवरून लॉजवर नेत अत्याचार केला. त्यानंतर ही त्याने पाच ते सहा वेळा अशाच प्रकारे अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारल्यानंतर आरोपी कादर हांडे याने लग्नास नकार दिला. याप्रकरणी आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: atrocities by lure of marriage and crime against youth