शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:54 AM

सोलापूर : बार्शी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व २0 हजारांच्या दंडाची शिक्षा ...

ठळक मुद्देआरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व २0 हजारांच्या दंडाची शिक्षा दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास ही शिक्षा सुनावलीबार्शी येथील सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

सोलापूर : बार्शी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व २0 हजारांच्या दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एस.आर. पाटील यांनी सोमवारी सुनावली. 

अजय अशोक क्षीरसागर (वय २५) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ मार्च २0१७ रोजी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी ८ वाजता शाळेला जात असताना अजय क्षीरसागर हा मोटरसायकलवर आला. मुलीस चाकूचा धाक दाखवून मोटरसायकलवर बसवले, परांडा येथील त्याच्या दुकानात नेऊन अत्याचार केला. मुलीस पुन्हा दुपारी १२.३0 वाजता शाळेजवळ आणून सोडले. मुलगी घरी आल्यानंतर घरात अबोला धरली होती. हा प्रकार आईच्या लक्षात आला, तिने मुलीस विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने सर्व प्रकार सांगितला. 

मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत आईने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी अजय क्षीरसागर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीवरून सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांनी अजय क्षीरसागर याला अटक करून गुन्ह्याचा तपास केला. बार्शी येथील सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणी घटना घडून वैद्यकीय पुरावा कमकुवत होता. खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीस भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे दोषी धरून ३ वर्षे सक्तमजुरीचा कारावास व १0 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास. बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा कलम ४ व भादंवि कलम ३७६ प्रमाणे १0 वर्षे सश्रम कारावास व २0 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास ही शिक्षा सुनावली. 

या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीप बोचरे, अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. शेटे, अ‍ॅड. सविता शेडबळ यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवीकर म्हणून पोलीस हेड कॉस्टेबल होटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

आरोपी पोलीस भरतीसाठी होता प्रयत्नशीलच्अजय अशोक क्षीरसागर हा आरोपी पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील होता, त्यामुळे त्याला कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. शाळेत १0 वीची परीक्षा सुरू होती, तिने पोलिसांना का सांगितले नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. यावर सरकारपक्षातर्फे मुलगी ही लहान असून ती निष्पाप आहे, तिला तेवढी समज नाही. मुलीच्या घरची परिस्थिती नाजूक असून तिला समाजाने संरक्षण देणे आवश्यक होते, असा युक्तिवाद केला. सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी