शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 3:06 PM

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. ...

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. तपासणी केल्यानंतर वारकºयाला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.

 प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही त्याला घेऊन पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. असाच दुसरा प्रकार. रिंगणावेळी मानाचा घोडा घसरू नये म्हणून फरशीवर बारदाना टाकला जातो. घोडा पुढे गेला की तोच बारदाना उचलून पुढे टाकला जातो. हे करीत असताना एक वृद्ध वारकरी बारदान्यावरून घसरून पडला. त्याच्या मणक्याचे हाड मोडले. गर्दीतून वाट काढीत त्या वारकºयाला आरोग्य केंद्रात आणले आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे लागले...

 पण १० वर्षांपूर्वी आळंदीमध्ये केलेल्या कामाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आषाढीच्या वारीत आरोग्य विभागाला २४ तास काम करावे लागते. पण हे काम अनेकांच्या लक्षात येत नाही. या वर्षी मी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालोय. पालखी मार्ग असो वा परिसरातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावून दमून जातात. पण मी माझ्या सर्व सहकाºयांना सांगितले आहे की, वारीमध्ये सहभागी झालेले लोक भाऊक असतात. त्यांना फक्त पंढरपूरचा विठ्ठल दिसतो. कामाचा कितीही ताण आला तरी त्यांच्याशी प्रेमाने वागा. एरव्ही आपण आरोग्य खात्याचे कर्मचारी असतो. 

आता आपण वारकºयांचे सेवेकरी होऊया. त्यांची वारी सुकर व्हावी, यासाठी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालूया.वारीला इव्हेंट मॅनेजर नाही. पण वारीतील शिस्त ही शासकीय यंत्रणेला खूप काही शिकायला देणारी आहे. यावर्षीही आम्ही जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करीत आहोत. आरोग्य दूत ही संकल्पना वारकºयांसाठी खूप चांगली ठरत आहे. बाहेरून ४० जणांचे पथक ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेत आले आहे. पंढरपूरच्या वाटेवर येणारे मरण चांगले मानले जाते. नदीपात्रात अपघातही होतात. अशा वेळी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हीच त्यांची वारी असते.शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर