शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 5:25 PM

पंढरपुरात २८ दुकानांतील मिठाई, खव्यांची तपासणी

ठळक मुद्देदुकानांतील पदार्थ, पेढे आणि उपवासाचे पदार्थ यांची तपासणी मोहीम हाती सध्या काही हॉटेलवर धाडी टाकून प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्याचे काम सुरु

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे़ प्रशासनाने पंढरपुरात वारीपूर्वीच २८ दुकानांमधून मिठाई आणि खव्यांची तपासणी केली आहे़ तसेच उपवासातील भगर, शाबुदाणा आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने घेतले असून, हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत़ 

दरवर्षी आषाढ महिन्यातील वारीनिमित्त पंढरपुरात राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात़ यंदा २३ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे़ या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लाखो भाविक दाखल होतात आणि त्यांना लागणारे उपवासाचे पदार्थ, फळे पुरवठा करताना भेसळीचा प्रकार घडू शकतो़ भाविकांच्या जीवाशी खेळले जाऊ नये म्हणून प्रतिबंधित अन्नपदार्थसाठा शोधमोहीम यंदाही हाती घेण्यात आली आहे़ तसेच दुकानांचे परवानेही तपासले जात आहेत़ या पार्श्वभूमीवर बहुतांश दुकानांना परवानेदेखील अन्न व औषध प्रशासनाने वेळेत वितरित केले आहेत़

निर्भेळ खाद्यपदार्थांबाबत हॉटेल व्यावसायिकांना प्रशिक्षण - वारी काळात विषबाधा वा कोणताही अपायकारक प्रकार घडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने निर्भेळ, स्वच्छ, शुद्ध खाद्यपदार्थ पुरवण्याबाबत हॉटेल व्यावसायिकांना प्रबोधन आणि प्रशिक्षण दिले जात आहे़ यासाठी कोका-कोला या आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेतली जात आहे़ या कंपन्यांकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालखी मार्गावर दोन बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे़ अन्नपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक  आणि पेयजल विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षाविषयक साहित्य, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रदेखील दिले जाणार आहे़

आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी समजली जाते़ बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खवा आणि इतर पदार्थही येतात़ या वारी काळात वारकºयांच्या जीवाशी खेळले जाऊ शकते़ या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पथके नेमली आहेत़ अनेक हॉटेल, दुकानांतील पदार्थ, पेढे आणि उपवासाचे पदार्थ यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे़ सध्या काही हॉटेलवर धाडी टाकून प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्याचे काम सुरु आहे़बाहेर जिल्ह्यातून येणारा खवा,  पेढ्यावर लक्ष आहे़ - प्रदीप राऊत, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

टॅग्स :SolapurसोलापूरFDAएफडीएAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर