शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 11:51 IST

अमित सोमवंशीसोलापूर :  पंढरपुरातील आषाढी वारीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी तयारी केली आहे़ त्याच अनुषंगाने पंढरपूर शहरातील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. याशिवाय वारीसाठी ३४१ अधिकारी आणि ४ हजार ५१० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़आषाढी ...

ठळक मुद्देचोरांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांचे एक पथक महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील छेडछाडविरोधी पथकवारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त

अमित सोमवंशीसोलापूर :  पंढरपुरातील आषाढी वारीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी तयारी केली आहे़ त्याच अनुषंगाने पंढरपूर शहरातील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. याशिवाय वारीसाठी ३४१ अधिकारी आणि ४ हजार ५१० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविकांबरोबरच काही  हौसे गवसेही येतात. चोरांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील छेडछाडविरोधी पथक तयार करण्यात आले आहे. वारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपुरात वाहतुकीची कोंडी होऊन  शहर ठप्प होऊ नये, यासाठी  शहराबाहेरच सर्व मार्गावर  स्वतंत्र पार्किंगची सोय  करण्यात आली आहे.  घातपातविरोधी पथकाचीही वारीवर नजर आहे. वारीच्या अनुषंगाने बीडीडीएस पथकाने चार रंगीत तालीम घेतल्या. 

वारी अनुषंगाने केलेली प्रतिबंधक कारवाई

  • - सीआरपीसी १०९-१३
  • - सीआरपीसी ११०-०९
  • - सीआरपीसी १५१(३)- ४
  • - महा. पोलीस अधि़ कलम १२२ क़- ३
  • - अवैध दारु धंद्यावर केलेली कारवाई - ८९
  • - फरार / पाहिजे असलेले आरोपी अटक -०७
  • - दहशतवाद विरोथी पथक (एटीसी सेल) चेकिंगची कारवाई
  • - घरमालक / भाडेकरु चेकिंग - ५५७
  • - स्फोटके / फटाके विक्रेते चेकिंग - २३४
  • - दुचाकी / चारचाकी वाहन विक्रेते चेकिंग - ३६१
  • - हॉटेल / लॉजेस चेकिंग - ८६६
  • - सायबर कॅफे चेकिंग - २४२
  • - मोबाईल सिमकार्ड विक्रेते चेकिंग - ६३१
  • - जिल्ह्यातील अवैध वाहतूक कारवाई
  • - ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह केसेस - ५२
  • - विनानंबर प्लेट / फॅन्सी नंबर प्लेट कारवाई - ७८
  • - अवैध प्रवासी वाहतूक कारवाई- ११४
  • - बिगर लायसन्स धारकांवर केलेले केसेस -६५
  • - ट्रिपल सीट केसेस - ३६९
  • - बेदरकारपणे वाहन चालविणाºयांवरील कारवाई - १०
  • - वारीसाठी स्थापन केलेली विशेष पथके
  • - पिक पॉकेटिंग व चेन स्नॅचिंग विरोधी पथके - ०३
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrimeगुन्हा