शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ

By appasaheb.dilip.patil | Published: July 22, 2018 10:13 PM

मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला

सोलापूर - मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हाभर ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे, एसटी ची तोडफोड झाली. काही मंत्र्याना आंदोलनकर्त्यांनी घेराव ही घातला होता.  यामुळे बिघडलेली परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजेसाठी येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी पंढरपूरला जाणे टाळले व पाठ फिरवली. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर एवढेच मंत्री हे सध्या पंढरपुरात आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. यामध्ये सर्वसामान्य भाविकांबरोबरच महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महापूजेला येऊ नये, अशी भूमिका घेत मराठा समाजातील आंदोलकांनी आंदोलन तीव्र केले. मराठा समाजाचे तीव्र झालेले आंदोलन पाहता अनेक मंत्र्यानी पंढरपूरला यायचे टाळले. त्या मुळे पंढरपुरातील बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

पंढरपुरात सध्या 10 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत दर्शनासाठी वारकर्‍यांनी मोठी गर्दी केली आहे सध्या दर्शन रांगेत 80 ते 90 हजार भाविक असून दर्शनासाठी 15 ते 16 तास लागत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी