चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी
By विलास जळकोटकर | Updated: January 25, 2024 18:14 IST2024-01-25T18:13:59+5:302024-01-25T18:14:30+5:30
अन्यत्र उपचारासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी
सोलापूर : स्टेअरिंवरील ताबा सुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने टँकरमधील दोघे जखमी झाले. गुरुवारी बार्शी तालुक्यातील शेळगाव येथील पुलाजवळ ही घटना घडली. सुमन विलास भोसले (वय- ३५), विलास नीलकंठ भोसले (वय- ४०, दोघे रा. राळेरास, ता. बार्शी) असे जखमींची नावे आहेत.
यातील डिझेल वाहतूक करणारा टँकर गुरुवारी सकाळी ७:३० च्या दरम्यान बार्शी रोडवर धावत असताना शेळगावजवळील गोल्डन हॉटेजवळ आला असताना चालकाचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला. जवळच असलेल्या पुलाजवळ तो पलटी झाली. यामध्ये वरील दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील महिला शुद्धीवर असून, विलास भोसले हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. दोघांवर उपचार करण्यात आले. अन्यत्र उपचारासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.